जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूलच्या गंधार पाटकर चे यश

कणकवली/प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवसाच्या निमित्ताने श्री चेस अकॅडमी कणकवली यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पहिली ते पाचवीच्या गटात ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे चा विद्यार्थी कु.गंधार हेमंत पाटकर (इयत्ता दुसरी) याने कास्यपदक मिळवत यश प्राप्त केले आहे. या गटामध्ये साधारण 40 विद्यार्थी सहभागी झाले होते, कु. गंधार हेमंत पाटकर याचा कांस्यपदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल त्याचा प्रशालेत ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम आयडियल इंग्लिश स्कूलचे कॉर्डिनेटर श्री.निलेश घेवारी सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
गंधारच्या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर कोषाध्यक्ष सौ. शीतल सावंत मॅडम सल्लागार डी. पी. तानावडे सर मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!