पाट हायस्कूल कलादालन मध्ये कलात्मक वस्तूंची निर्मिती

पाट हायस्कूलमध्ये कै.एकनाथजी ठाकूर कला अकादमी मार्फत कलाविषयक विविध उपक्रम घेतले जातात. यावर्षीही हार्मोनियमचे वर्ग, तबलावादन वर्ग ,नृत्य वर्ग, ग्रेड परीक्षा वर्ग सुरू करण्यात आले असून त्या मार्फत विविध उपक्रम घेतले जातात.
बऱ्याच पाहुण्यांची भेट यामुळे पाट हायस्कूलच्या कै एकनाथजी ठाकूर कला अकादमी मध्ये होत असते. दापोली कृषी विद्यापीठ अंतर्गत मध्ये येथील उद्यानविद्या महाविद्यालयातर्फे एक आगळावेगळा कलात्मक वस्तू बनवण्याचा कार्यक्रम कलादालनामध्ये घेण्यात आला. यामध्ये बॉटल गार्डन, पुष्परचना ,माडांच्या झावळापासून विविध कलात्मक वस्तू बनवणे. विशेष म्हणजे कोकेडेमा असे देशी विदेशी कलाप्रकारही मुलांसाठी दाखविण्यात आले.
यावेळी कोकेडामा (Kokedama) म्हणजे जपानमधील एक अनोखी बागकाम कला, जिथे झाडाची मुळे मातीच्या गोळ्यात वाढवली जातात आणि दोरीने बांधून टांगले जाते, हे घरात सजावटीसाठी वापरले जाते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि हवा शुद्ध होते. याविषयी माहिती दिली.
पाट विद्यालयात मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वतीने ग्रामिण उद्यानविद्या कार्यानूभव प्रात्यक्षिक अर्तर्गत विद्यार्थिनी सृष्टी संतोष देशमुख .सिद्धी संदीप कोलंबे, स्नेहल सिद्धेश्वर गरांडे, शालिनी जोमा पारधी, वैष्णवी अप्पा पावल, माधवी संतोष राटटे, धनश्री रत्नाकर वणकर, श्रुती बाबासाहेब शिरगुरे उपस्थित होत्या.
तयार केलेल्या वस्तू मुख्याध्यापक सयाजी बोंदर त्याचप्रमाणे पर्यवेक्षिका अंकिता मोडक यांच्याकडे सोपविण्यात आल्या. कला दालनामध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची विद्यार्थ्यांनी पाहणी केली. कलाशिक्षक संदीप साळस्कर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली या विशेष उपक्रमाचे कौतुक संस्था कार्यकारणीच्या वतीने करण्यात आले.

error: Content is protected !!