शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर, पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज

जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रतिपादन
शिवडाव, नाटळ, नरडवे, कुंभवडे शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना रक्तचंदनाच्या रोपांचे वाटप
माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या संकल्पनेमधून वृक्ष लागवडीची आवड निर्माण होईल या हेतूने शिवडाव माध्यमिक विद्यालय, नरडवे इंग्लिश स्कूल-नरडवे,माध्यमिक विद्यालय नाटळ व शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथील शेकडो विद्यार्थ्यांना रक्तचंदनाचे रोपे वाटप करण्यात आली.
पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे.जगभरात हवामान बदलाचे वाढते परिणाम, एल निनो (El Niño) सारख्या नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण होणारे दुष्काळ, अवेळी पाऊस आणि तापमानवाढ यांचा विचार करून पर्यावरण संवर्धनासाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे,त्याचे संगोपन करावे आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. रक्तचंदन हे आर्थिक,औषधी आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाचे वृक्ष मानले जाते.या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्यास भविष्यात हरित पर्यावरण निर्मितीस मदत होणार असून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीवही निर्माण होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असून,पालकमंत्री श्री.नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हरित सिंधुदुर्ग आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
यावेळी हरकुळ बुद्रुक गावचे सरपंच आनंद ठाकूर, तुषार सावंत, हनुमंत घाडीगावकर, एकनाथ सावंत, अंकुश सावंत, कुंभार सर, माध्यमिक विद्यालय नाटळ चे चेअरमन नितीन सावंत, मुख्याध्यापिका प्रणिता तेली, मिलिंद डोंगरे आदी महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






