माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे नागरी हक्क संरक्षण विषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.ज्योती चव्हाण यांनी केले मार्गदर्शन.

कणकवली:प्रतिनिधी

विद्यार्थ्यांमध्ये नागरी हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने नागरी हक्क संरक्षण,एसपी ऑफिस सिंधुदुर्ग यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात विद्यार्थ्यांना नागरी हक्क,कायदेविषयक जनजागृती तसेच सामाजिक उत्तरदायित्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.ज्योती चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नागरी हक्कांचे महत्त्व,महिलांवरील अत्याचार प्रतिबंध,बालकांचे संरक्षण,सायबर गुन्ह्यांपासून बचाव तसेच कायद्याचे पालन करण्याची आवश्यकता याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास नागरी हक्क संरक्षण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती चव्हाण व त्यांचे सहकारी,शालेय समिती अध्यक्षा भाग्यरेखा दळवी, खजिनदार श्री.कृष्णा गावकर, शिवडाव सेवा संघ मुंबईचे कार्यवाह श्री.प्रकाश शिरसाट,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पवार सर तसेच शिवडावचे पोलीस पाटील मयूर ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मुंबरकर सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत शिबिराचा लाभ घेतला. नागरी हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मार्गदर्शक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!