वेंगुर्ला हायस्कूलचा दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला येथील विद्यार्थ्यांनी मार्च २०२६ मध्ये झालेल्या एस.एस.सी. (दहावी) बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सेमी माध्यमातून कु. रामकृष्ण बाळकृष्ण गावडे यांनी ९५.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. गिरीजा सुनिल कुमार चव्हाण ९४.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. कु. श्रावणी राजेंद्र सूर्यवंशी93.80टक्के व कु. प्रबोध सुनिल जाधव यांनी प्रत्येकी ९३.८० टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले.
मराठी माध्यमातून कु. अरमान अब्दुलशमी शेख यांनी ६४.०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. कु. श्रेया उल्हास कदम यांनी ६१.८० टक्के तर कु. खुशबू बाबुरजाक शहा यांनी ६०.२० टक्के गुण प्राप्त करून यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे माननीय मुख्याध्यापक, सचिन बिडकर सर शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे वेंगुर्ला हायस्कूलच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.





