आजगाव मध्ये गेले तसे पालकमंत्री औष्णिक प्रकल्पाच्या विरोधात कुणकेश्वर मंदिरात बैठक घेऊन घोषणा करतील काय!

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा पालकमंत्र्यांना सवाल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मायनिंग ची सुरुवात राणे महसूल मंत्री असताना झाली
परशुराम उपरकर यांचा आरोप
आजगाव येथील मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही अशी घोषणा करून पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. जर पालकमंत्री आजगाव येथील मायनिंग प्रकल्पाबाबत ही भूमिका घेत असतील तर ज्या भागातून ते निवडून आले त्या देवगडमध्ये औष्णिक प्रकल्पला विरोध करण्यासाठी पालकमंत्री कुणकेश्वर मंदिरात बसून विरोधाची भूमिका जनतेसोबत घेतील काय असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला. येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. उपरकर पुढे म्हणाले, पालकमंत्र्यांच्या आदेशामुळेच ते गुप्त केलेले व्हिडिओ शूटिंग बाहेर आले. ज्या प्रकारे आजगाव मध्ये मायनिंग प्रकल्पाला विरोध झाला त्यात प्रकारे औष्णिक प्रकल्पाला देखील विरोध आहे त्यामुळे पालकमंत्री अशीच भूमिका येथे घेणार का याचा प्रश्न जनतेमध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अर्थाने मायनिंगचा उगम हा नारायण राणे महसूल मंत्री असताना कळणे येथे झाला. माधवराव गाडगीळ अहवाल चे समर्थन शिवसेना त्यावेळी करत होती मात्र हा अहवाल कसा घातक आहे हे नारायण राणे त्यावेळी जनतेला सांगत होते. राजापूर येथे येणाऱ्या व सिंधुदुर्गातील काही गावे त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या माणिक प्रकल्पाला जेव्हा विरोध झाला तेव्हा भाई गिरकर यांच्यावर दगडफेक करून त्यांचं डोकं फोडलं गेलं. त्याची सुद्धा माहिती पालकमंत्र्यांनी घ्यावी त्यामुळे त्यांना त्यावेळी भाजपची भूमिका काय होती व आता काय आहे हे आपल्याला समजेल असा टोला त्यांनी लगावला. कळणे मायनिंगचा उगम झाला त्यावेळी राणेंचे दोन्ही पुत्र राजकारणात कुठेही नव्हते.तत्कालीन जिल्हाधिकारी निधी पांडेच्या नेतृत्वाखाली राणी पालकमंत्री असताना जनसुनावणी घेण्यात आली व ती त्यांची आपल्या जोरावर रेटून नेली. जिल्ह्यातल्या जनतेला रोजगार देण्याची पालकमंत्र्यांची भावना असेल तर स्वतःच्याच वडिलांनी केंद्रीय मंत्री असताना प्रशिक्षण केंद्रासाठी जो 2011 मध्ये काळात 200 कोटीचे ट्रेनिंग सेंटर आणणार अशा प्रकारचे सांगून जनतेला खोटं बोलले ते ट्रेनिंग सेंटर खऱ्या अर्थाने जर सिंधुदुर्गात झाले तर त्याला आमचा विरोध नसेल असेही उपरकर यांनी सांगितले. व याकरिता शिवसेना यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाईल. तसेच होणाऱ्या अधिवेशनामध्ये पालकमंत्री प्रकल्प रद्द केल्याची घोषणा करतील काय? असा देखील सवाल उपरकर यांनी उपस्थित केला आहे.





