प्रकाश मेस्त्री यांच्या कडून गुणवंतांचा सन्मान

सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई चे संचालक मा.श्री.प्रकाश मेस्त्री यांनी ज्ञानदीप माध्यमीक विद्यालय वायंगणीच्या सन २०२६ /२७ मध्ये दहाविच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेला विद्यार्थी कु.यज्ञेश राजेश गोलतकर ८९.६०% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या बद्दल त्याला कै.वसंत दिनकर मेस्त्री स्मरणार्थ रक्कम रू. ५५५५/-चा धनादेश देऊन गौरविण्यात आले त्याचप्रमाणे चालू वर्षातील दहावीचे दोन विद्यार्थी कु.सोनिया तोंडवळकर व कैवल्य सावंत यांना दत्तक घेऊन त्यांना वर्षभरात शैक्षणिक साहित्य व सुविधा पुरविण्यात येणार आहे असे त्यांनी सुचित केले.
आज छोटेखानी झाले ल्या या कार्यक्रमात मुलांना त्यांनी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम संस्था अध्यक्ष श्री हनुमंत प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यपक श्री टकले सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

error: Content is protected !!