सिंधुदुर्गच्या सुयोग धामापूरकर यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच म्हणून निवड

सिंधुदुर्गला अभिमानाची भर; सुयोग धामापूरकर राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच
सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलचे जिल्हाध्यक्ष श्री. सुयोग मारुती धामापूरकर यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच (State Chess Arbiter) म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
महाराष्ट्र चेस असोसिएशनतर्फे रत्नागिरी येथे आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
बुद्धिबळ क्षेत्रातील त्यांचे नेतृत्व, संघटन कौशल्य व सातत्यपूर्ण कार्य यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलला नवी दिशा मिळाली आहे. शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!






