घरावर झाड पडुन नुकसान झालेल्या वृद्ध महीलेला मनसेचे आर्थिक सहकार्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी अणाव येथील वृद्ध महिला नुकसानग्रस्त श्रीमती शांती अणावकर यांना मनसेच्या वतीने आर्थिक मदत दिली. श्रीमती अणावकर यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त बॅनरबाजी व इतर शुभेच्छा पर कार्यक्रम न करता सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रम आदेश दिले होते. याचा अनुषंगाने हि मदत देण्यात आली.
श्रीमती अणावकर यांच्या घराची ऐन पावसाळ्यात त्वरित दुरुस्ती आवश्यक होती. त्याच्या दुरुस्ती करता हि आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आली. मनसेचे स्थानिक उप तालुकाध्यक्ष अवि अणावकर यांनी ही बाब जिल्हाध्यक्षांकडे मांडली. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत श्रीमती शांती अणावकर यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मनसेचे नेते शिरीष सावंत यांच्या हस्ते ही आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, प्रभारी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, उप तालुकाध्यक्ष अवि अणावकर व इतर स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.





