इंधन दरवाढी विरोधात सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडीत शिवसेनेचे जोरदार आंदोलन

मोदी आणि फडणवीस सरकार विरोधी घोषणांनी वैभववाडी शहर दणाणले
मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय धोरण चुकविल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका- सुशांत नाईक
मोदी सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली असून पेट्रोल डिझेलचा पुरवठा देखील सुरळीत होत नाही. नागरिकांना भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. या विरोधात आज युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले. वैभववाडी शिवसेना शाखेपासून वैभववाडी चौक ते बाजारपेठ मार्गे वैभववाडी नगरपंचायत पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला शिवसैनिकांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद लाभला होता. मोदी आणि फडणवीस सरकार विरोधी घोषणा देऊन शिवसैनिकांनी वैभववाडी शहर दणाणून सोडले.
दरम्यान वैभववाडी शहरातील पेट्रोल पंपावर मोर्चा नेऊन पेट्रोल डिझेलचे दर आणि पुरवठयाबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी डिझेल संपले असून पेट्रोल संपत आल्याचे सांगितले. मात्र जिल्हाधिकारी सांगतात पुरवठा सुरळीत आहे मग लोकांना रांगा का लावाव्या लागत आहेत? असा शिवसैनिकांकडून जाब विचारण्यात आला. यावेळी कहा गये अच्छे दिन, कहा गये अच्छे दिन! पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो! रद्द करा, रद्द करा पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा!, पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेच पाहिजेत! अशा आशयाचे फलक झळकविण्यात आले.
याप्रसंगी सुशांत नाईक म्हणाले, पेट्रोल डिझेलचे दर आज तीन रुपयांची वाढले आहे येत्या काही दिवसांत ते दर २० ते ३० रुपयांनी वाढणार आहेत. मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय धोरण चुकविल्यामुळे सर्व सामन्यांना या महागाईला सामोरे जावे लागत आहे. रशिया देश भारताला कच्चे तेल देण्यास तयार आहे परंतु त्याला अमेरिकेचा विरोध असल्याने मोदी सरकार रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू शकत नाही. आंतरराष्ट्रीय धोरण ठरविण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. इतर पर्याय असूनही मोदी आणि फडणवीस सरकार जाणीवपूर्वक इंधनाची टंचाई निर्माण करीत आहे. रुपयाचे मूल्य देखील घटले असून लवकरच १०० पार होणार आहे. त्यामुळे आता सर्वच गोष्टी महाग होणार आहेत. सर्वसामान्यांना याचा विनाकारण फटका बसत आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे. पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सांगतात परंतु सिंधुदुर्गात वस्तुस्थिती वेगळीच आहे. त्यामुळे यापुढे दरवाढ होता नये आणि पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आम्ही हे आंदोलन केले असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईचे नगरसेवक रमाकांत रहाटे, वैभववाडी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, यशवंत गवाणकर, गुलजार काझी, लक्ष्मण रावराणे, मनोज सावंत, जितेंद्र तळेकर, सुनील पवार, रत्नकांत कदम, दीपक चव्हाण, दत्ताराम राणे, विठोबा गुरव, ओंकार इस्वलकर, अनंत नांदलकर, धाकोजी सुतार, प्रकाश धवटे, चंद्रकांत कोलते, विश्वास शिंदे, शशिकांत तळेकर, संदीप कोलते, सुभाष वळंजू, नितेश मोरे, नारायण गुरव, शिवाजी परब, दिलीप पांचाळ, रमाकांत मोरे, श्री. रावराणे, सुरेश पाळये, रमेश पाटील, मंथन सुतार, सूर्यकांत परब, लवेश शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते.





