ओवी शेटे ची आईस स्पीड स्केटिंग राज्य अजिंक्यपद स्पर्धेत शानदार कामगिरी..

एक सुवर्णपदकासह तीन रौप्य पदक..

मसुरे चांदेरवाडी येथे आजोळ असलेले आणि मूळ गुहागर येथील सद्यस्थितीत मुंबई ठाणे येथे वास्तव्यास असलेली कुमारी ओवी सुदर्शन शेटे हिने उत्तराखंड डेहराडून हिमाद्री आईस रिंक येथे 13 आणि 14 मे या कालावधीत संपन्न झालेल्या आईस स्पीड स्केटिंग राज्य अजिंक्यपद स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आईस स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये लॉन्ग ट्रॅक स्पीड स्केटिंग 777 मीटर या प्रकारात एक सुवर्णपदक आणि आईस शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग 500 मीटर रौप्य पदक, लॉन्ग ट्रॅक स्पीड स्केटिंग 500 मीटर रौप्य पदक,शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग 1000 मीटर रौप्य पदक अशी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये ओवी हिने एक सुवर्णपदक आणि तीन रौप्य पदकाची कमाई करून
गुहागर, मुंबई, ठाणे, आणि मसुरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ओवी शेटे हिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.

ओवी शेटे ही ठाणे येथील हिरानंदानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. लहानपणापासूनच ओवी हिला आईस स्केटिंगची आणि रोड स्केटिंग ची आवड होती. ओवी सध्या ठाणे येथील राईसा क्लबमध्ये स्केटिंगचं प्रशिक्षण घेत आहे.
यासाठी तिला देशातील स्केटिंग चे प्रसिद्ध प्रशिक्षक राहुल पंदिरकर आणि तिची आई रीना सुदर्शन शेटे परब, आजोबा बाबा परब हिचे मार्गदर्शन लाभत आहे. ओवी हिने यापूर्वी अनेक जिल्हा, राज्य, नॅशनल आईस स्केटिंग आणि रोड स्केटिंग स्पर्धेमध्ये अजिंक्य पदे मिळविली आहेत. स्केटिंग मध्ये ओवी ही अगदी लहानपणापासूनच स्केटिंग चा सराव करत आहे. ओवी शेटे ही गुहागर येथील प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेटे तसेच मसुरे चांदेरे आणि कुर्ला बैल बाजार येथील समाजसेवक बाबा परब तसेच प्रसिद्ध उद्योजक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष डॉक्टर दीपक मुळीक परब यांची ती नात आहे. स्पर्धेदरम्यान ओवी हिला प्रसिद्ध प्रशिक्षक राहुल पंदिरकर यांनी मार्गदर्शन केले होते. ओवी हिला अमिताभ शर्मा आणि दोन वेळेचे ऑलिम्पिक चॅम्पियन फ्रेडरिक ब्लॅक बर्न यांच्या हस्ते ओवीचा गौरव करण्यात आला. मसुरे चांदेरवाडी ग्रामस्थांच्या वतीने लवकरच ओवी शेटे हिचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. ओवी शेटे हिची आई रीना शेटे ही सुद्धा राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू होती आणि आता ती ठाणे येथे नवोदित खेळाडूंना स्केटिंग चे प्रशिक्षण देत आहे. ओवी हिचे मसुरे माजी सरपंच लक्षमी पेडणेकर पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, जि प सदस्य क्षमा हडकर, माजी जि प अध्यक्ष सरोज परब,नाथा मुळीक, आनंद मुळीक, जयेश परब,नवतरुण मित्र मंडळ चांदेरवाडी आणि मसुरे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे..

error: Content is protected !!