पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कणकवलीकरांचे प्रश्नचिन्ह?

कणकवली पोलिसांच्या विरोधात कणकवलीकरांचा निषेध मोर्चा
कणकवली शहरातील परी सलून बंद करण्याची मागणी
कणकवलीतील परी सलून मधील दोन युवकांनी शहरातील एका अल्पवयीन दिव्यांग मुलीची छेड काढल्याच्या घटनेनंतर त्या युवकांवर गुन्हे दाखल झाले. परंतु त्यासोबत या प्रकरणी त्या परप्रांतीय तरुणांना जाब विचारणाऱ्या इतर तरुणांवर व महिलांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या निषेधार्थ कणकवली शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी कणकवली शहरातून पोलीस स्टेशन पर्यंत काळ्याफिती लावून निषेध मोर्चा काढला. कणकवली तेली आळी या ठिकाणी हा मोर्चा सुरू झाला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय पक्षाचे पदाधिकारी व महिला सहभागी झाल्या होत्या.





