परदेश दौऱ्यांवर बंदी

मोदींच्या सूचनेनंतर मोठा निर्णय

इंधन टंचाईमुळे सरकार अलर्ट

देशातील वाढती इंधन टंचाई आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आगामी सर्व परदेश दौरे तातडीने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, ज्या दौऱ्यांना यापूर्वी मंजुरी मिळाली होती किंवा पूर्वतयारी पूर्ण झाली होती, असे दौरे देखील आता रद्द करावे लागणार आहेत. विविध सरकारी कामे किंवा अभ्यास दौर्‍यांच्या नावाखाली होणाऱ्या परदेश प्रवासावर यामुळे मोठा परिणाम होणार आहे.
परकीय चलनाची बचत आणि सरकारी खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
यापुढे अत्यावश्यक कारणाशिवाय परदेश दौऱ्यांना परवानगी दिली जाणार नसल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

error: Content is protected !!