प्रशासनाने मुहूर्तळीवाडी येथील दगड हलवला – तहसीलदार

नुकसानग्रस्तांना लवकरच अनुज्ञेय अनुदान मिळणार
कोणत्याही भूलथापा वा खोट्या अफवांना बळी न पाडण्याचे आवाहन
वालावल-मुहूर्तळीवाडी येथे दरड कोसळून घराला आदळलेला मोठा दगड जेसीबीच्या हाय्याने हटविण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली. तहसीलदार कुडाळ यांनी स्वतः आज तिथे भेट देऊन आढावा घेतला आहे. सदर लोकांना स्थलांतरित होण्यासाठी निर्देशसुद्धा दिलेले आहेत. महत्वाचे म्हणजे अंशतः नुकसान झालेल्या घराचा पंचनामा करण्यात आलेला असून शासनातर्फे लवकरात लवकर अनुज्ञेय मदत देण्याची तजवीज करण्यात येत आहे. दरम्यान कोणत्याही भूलथापा वा खोट्या अफवांना बळी न पडता प्रशासनाशी संपर्क साधून माहिती देण्याचे किंवा अशा प्रकारची माहिती पडताळण्याचे नागरिकांना आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे
तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, मुहूर्तळीवाडी येथील दरड कोसळल्याच्या बाबतीत प्रशासन घटना घडल्यापासून संबंधित लोकांच्या संपर्कात आहे. प्रशासन अपघात स्थळावर उपस्थित होते व आहे. नैसर्गिक आपत्तींना योग्य पद्धतीने तोंड देण्याकरिता कुडाळ तालुक्याची आपत्ती व्यवस्थापन बैठक प्रांत मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली दि. २४ एप्रिल २०२६ रोजी घेऊन विविध सूचना देण्यात आल्या आहेत. त्यावेळी तिथे प्रशासकीय विभागाबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी जसे की सरपंच सुद्धा उपस्थित होते.
मुहूर्तळीवाडी येथील घटनेत आमचे क्षेत्रीय अधिकारी तिथे स्वतः गेले होते. महसूल कर्मचारी यांनी जेसीबीची सोय करून दगड हलवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला व अनुषंगिक सर्व सहकार्य केले होते. तसेच दुर्दैवाने दगड कोसळल्यास घराला क्षती पोचू नये अशी सोय केली आहे
तहसीलदार कुडाळ यांनी स्वतः आज तिथे भेट देऊन आढावा घेतला आहे. तेथील लोकांना स्थलांतरित होण्यासाठी निर्देशसुद्धा दिलेले आहेत. महत्वाचे म्हणजे अंशतः नुकसान झालेल्या घराचा पंचनामा करण्यात आलेला असून शासनातर्फे लवकरात लवकर अनुज्ञेय मदत देण्याची तजवीज करण्यात येत आहे.
तालुका प्रशासन नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सजग आणि सतर्क आहे. या निमित्ताने कोणत्याही भूलथापा वा खोट्या अफवांना बळी न पडता प्रशासनाशी संपर्क साधून माहिती देण्याचे किंवा अशा प्रकारची माहिती पडताळण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे





