कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देणार?

आंबा-काजू उत्पादकांसाठी मोठी मागणी

कोकणातील नुकसानीवर उच्चस्तरीय बैठक

कोकणातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणेला तातडीच्या सूचना देण्यात आल्या असून नुकसानग्रस्त भागातील पंचनामे पारदर्शक आणि वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण लवकर पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले.
या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले उपस्थित होते.
दरम्यान, सध्या जाहीर करण्यात आलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत अपुरी असल्याची टीका शेतकरी संघटनांनी केली आहे. आंबा पिकासाठी हेक्टरी ५ लाख रुपये आणि काजूसाठी ३ लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली.
तसेच एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

error: Content is protected !!