नेरूर-सायचे टेंब येथे श्री देव विश्वकर्मा जयंती उत्सव
कुडाळ : श्री देव विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज दशावतार नाट्य मंडळ, नेरूर सायचे टेंब, नेरूर यांच्यातर्फे श्री देव विश्वकर्मा जयंती उत्सव २०२३ शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त गुरुवार, २ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता खेळ पैठणीचा, रात्री ९ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत. तर शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता लघुरुद्र, सकाळी ११.३० विश्वकर्मा पूजा (आरती व तीर्थप्रसाद), सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५ वाजता स्थानिक भजने होणार आहेत. तसेच रात्री ९ वाजता नेरूर सायचे टेंब-सुतारवाडी येथे श्री देव विश्वकर्मा दशावतार नाट्य मंडळ नेरूर सायचे टेंब यांचा ट्रिकसीनयुक्त पौराणिक नाट्यप्रयोग “गर्वपरिहार” होणार आहे.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ