खारेपाटण प्रा. आ. केंद्रात जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

खारेपाटण प्रा. आ. केंद्र येथे काल शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी जागतिक हिवताप (मलेरिया) दीन कर्मचारी व रुग्ण तसेच नागरिक यांच्या उपस्थित त्यांना मार्गदर्शन करून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रा. आ. केंद्राचे आरोग्य सहायक श्री. पी एस भागवत, फार्मसिस्ट बी एस डोंगरे, अशा स्वामसेविका गट प्रवर्तक सौ. संकिता पाटणकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी श्री. सिद्धेश बेळेकर, आरोग्य सेवक गणेश तेली, व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी वृंद व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
आजच्या हिवताप दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आरोग्य सेवक श्री. पी एस भागवत, श्री गणेश तेली, आर जी नायकोजी, समुदाय आरोग्य अधिकारी श्री. प्रणव पाटील, यांनी उत्कृष्ट कामगिरी सर्व्हे करून परिसरातील ४ हत्ती रोग बाधित रुग्ण शोधून काढले. याबद्दल आजच्या जागतिक हिवताप दिनी खारेपाटण प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांच्या शुभहस्ते या सर्व कर्मचारी वर्गाचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
‘हिवताप हा हजारो वर्षापासून मानवाला परिचित असलेला आजार आहे. मलेरिया या शब्दाचा उगम इटालियन शब्दातून झाला असून याचा अर्थ दूषित हवा (bad air) असा होतो. १८८० पर्यंत आसा समज होता की, हा आजार दलदलीच्या ठिकाणच्या दूषित हवेमुळे होतो. मात्र विद्यानाच्या प्रगतीमुळे हा डासांपासून होणारा आजार असल्याचे सिद्ध झाले. काल २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप जनजागृती दीन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. असे प्रतिपादन डॉ. प्रिया वडाम यांनी यावेळी सांगितले.”





