नालासोपारा पूर्व येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.५६९ व आम्रपाली महिला मंडळ ,विजय नगर ,नागीनदास पाडा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती धूम धडाक्यात साजरी करण्यात आली.हा कार्यक्रम शाखेचे अध्यक्ष आयु.अशोक पां कांबळे शेर्पेकर यांच्या अध्यक्षतेखाली विनय विद्यालय नागीनदास पाडा मोरेगाव नालासोपारा पूर्व येथे थाटामाटात पार पाडण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्थाविक शाखेचे खजिनदार आयु ऍड रवींद्र जाधव यांनी केले तर सूत्र संचालन शाखेचे चिटणीस दयानंद जाधव यांनी केले.या जयंती उत्सवामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.प्रेरणा जाधव,स्वप्नील सुर्वे,भावेश जाधव,आम्रपाली महिला मंडळाच्या सल्लागार मनीषा जाधव यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रमघेतले,मनीषा जाधव, महिलामंडळाच्या अध्यक्षा रुक्षिता कांबळे,चिटणीस शीतल जाधव यांनी अप्रतिम अशी रांगोळी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये संगीत खुर्ची,चमचा गोटी,बास्केट बॉल,कारभारी लय भारी,फॅन्सी ड्रेस,शेपूट लावणे,गाणी,कविता वाचन,भाषणे,असे अनेक खेल घेण्यात आले.प्रत्येक खेळामध्ये पहिला,दुसरा,तिसरा असे नंबर काढुन त्याना सन्मान चिन्ह तर सहभाग घेणाऱ्या प्रत्येकास मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.शाखेने या वर्षी एक नवीन उपक्रम सुरू केला तो असा शाखेचे चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला एक विशेष असा उत्कृष्ट कार्यकर्ता हा पुरस्कार देण्याचा.या पहिल्या वर्षाचा मानकरी शाखेचा तरुण तडफदार कार्यकर्ता स्वप्नील विजय सुर्वे हा ठरला,शाखेचे अध्यक्ष अशोक कांबळे शेर्पेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शेवटी आभार प्रदर्शन आणि स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!