जनगणना निरीक्षक सुमित दास व अरुण साळगावकर यांनी घेतला कणकवलीत आढावा

प्रत्येक प्रगनकाने जनगणनेचे काम उस्फूर्तपणे करा
तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले स्वागत
जनगणना निरीक्षक श्री. सुमित दास व श्री. अरुण साळगावकर यांनी कणकवली येथे सुरू असलेल्या प्रगणकांच्या प्रशिक्षणाला भेट दिली.
यावेळी त्यांनी जनगणना हे राष्ट्रीय कामकाज असून प्रत्येक प्रगणकाने उत्साहाने ते केले पाहिजे असे आवाहन केले.उपस्थित सर्वांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व 1 मे पासून सुरू होणाऱ्या स्वगणना कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी त्यांचे स्वागत केले.





