तळवडे येथे निमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वरधारा भजन मंडळ तांबोळी प्रथम तर व्दितीय श्री स्वामी समर्थ भजन मंडळ कवंबिस्त

खासदार विनायक राऊत यांनी केले स्पर्धेचे उद्घाटन
सावंतवाडी प्रतिनिधि
तळवडे भजनप्रेमी व ग्रामस्थ आयोजित कै . प्रकाश परब स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या निमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वरधारा भजन मंडळ, (तांबोळी ) यांनी पटकावला . व्दितीय श्री स्वामी समर्थ भजन मंडळ, ( कलंबिस्त ) तृतीय श्री सद्गगुरु भजन मंडळ ( तुळस वडखोल ) तर उत्तेजजनार्थ स्वरसाधना भजन मंडळ ( डिगस ) यांनी मिळविला . उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे उकृष्ट गायक ( अमित तांबोळकर ) उकृष्ट हार्मोनियम ( प्रताप तांबोळकर ) उकृष्ट पखवाज ( प्रथमेश राणे ) उकृष्ट तबला ( ओमकार तळवणेकर ) उकृष्ट झांजवादक ( शिवराम सावंत ) उकृष्ट अंभग ( संतोष धर्णे ) उकृष्ट कोरस महापुरुष भजन मंडळ, ( पिंगुळी ) तसेच शिस्तबद्ध संघ सद्गगुरु भजन मंडळ ( तुळस वडखोल ) यांनी मिळविला . या स्पर्धेला परीक्षक म्हणून राजू सावंत ( कुडाळ ) व संजय दळवी ( तळगाव मालवण ) यांनी काम पाहिले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव तळवडेकर यांनी केले .
कै . प्रकाश परब स्मृती भजन स्पर्धेच्या उद्धाटनप्रसंगी बोलताना स्तुत्य उपक्रम कै . प्रकाश परब यांच्या नावाने घेत असतात परब आणि माझी फार वर्षांपूर्वीची गोष्ट नाही मी ज्यावेळेला काम करायला सुरुवात केली त्यानंतर काही वर्षानी त्यांची आणि माझी दोस्ती झाली. आणि सामाजिक कार्यातून नातं निर्माण झालं . अत्यंत प्रेमळ असा, स्वभाव सामाजिक कार्याची जाण असलेले लोकांच्या प्रति आपण काय केले पाहिजे याची परिपूर्ण जाणीव असलेले असे ते नेतृत्व होते .पण दुदैवाने आपल्याला सोडून गेले आणि त्यांच्या स्मरणार्थक या भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच आयोजकांचे मनापासून मी आभार मानतो स्पर्धा जी आयोजन करत असताना आपली जी भावना आहे. श्रध्दा आहे .हरिनामावर व भगवंतावर ती श्रध्दा ठरवताना आपल्याला निर्भिंडपणे ही भजन स्पर्धा पार पाडण्यासाठी उपयोगी पडणार आहे. असे प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार विनायक राऊत यांनी केले .
यावेळी या कार्यक्रमा उद्घाटन प्रसंगी जान्हवी सावंत , बाळा गावडे, शब्बीर मणियार, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार,तळवडे सरपंच वनिता मेस्री, तळवडे विकास सोसायटी चेअरमन आपा परब, तंटामुक्ती अध्यक्ष रविंद्र काजरेकर , विभागप्रमुख नमिता सावंत , सौ. विणा दळवी ,उपविभागप्रमुख प्रशांत बुगडे , विलास परब, उपसरपंच गौरव मेस्री, शाखाप्रमुख अनिल जाधव , सुरेश गावडे, राजाराम गावडे , योगेश सावंत , बंड्या परब , बाळू कांडरकर , महेश परब , दिनेश परब , संतोष राऊळ , संतोष परीक्षक राजू सावंत संजय दळवी आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.