कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार

कै. सुबोध टिकले स्मरणार्थ रक्तदान शिबिर

चित्रकला, पाककला स्पर्धांसह शहरातील विविध 14 विकास कामांची भूमिपूजन

कणकवली शहराचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस यावर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. कणकवली एचपीसीएल हॉल या ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहराचे नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिला वाढदिवस कणकवली नगरीमध्ये साजरा होणार आहे. गेली वीस वर्ष सामाजिक बांधिलकी ठेवून वाढदिवस साजरा केला जाणार आहे. हा वाढदिवस म्हणजे शहरवासीयांसाठी उत्सव असणार आहे. या कार्यक्रमांमध्ये 1 हजार वृक्ष लागवड, सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ 500 जणांचे महा रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी पाककला स्पर्धा, गणवेश वाटप कणकवली शहरातील 14 विकास कामांची भूमिपूजन, शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, करण्यात येणार आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न सुरू आहेत याचे काम 50% करण्यात आले आहे. उर्वरित काम लवकरच मार्गी लावले जाईल. स्वयंभू नमो उद्यानाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले असून शहरातील गणपती साना, फ्लाय ओव्हर ब्रिज खालील सुशोभीकरण या कामांची देखील भूमिपूजन या निमित्त केली जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असा आवाहन संदेश प्रेमी व हितचिंतक आयोजक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!