घोडावत गुळ प्रकल्पाचे धुराडे कोसळले

चिपरी येथे सुरू असलेल्या घोडावत कन्झ्युमर लि. गुळ प्रकल्पाचे धुराडे 17 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अवकाळी पावसा मुळे सांगली, कोल्हापूर, सातारा येथे सायंकाळ झाली की जोराचा सोसाट्याचा वारा सुटतो. वादळाची परिस्थिती निर्माण होऊन पाऊस पडतो. 17 मार्च रोजी झालेल्या वादळ वाऱ्यामुळे चिपरी येथील घोडावत कन्झ्युमर लि. गुळ प्रकल्पाचे धुराडे (चिमणी) कोसळले. यावेळी उपस्थित असलेले कामगार प्रकल्पात काम करत होते. धुराड्याच्या आसपास कोणी नसल्यामुळे जीवित हानी टळली. धुराडे कोसळल्यामुळे प्रकल्पाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.

error: Content is protected !!