बॅडमिंटन स्पर्धेच्या माध्यमातून कणकवलीतील खेळाडू देश स्तरावर पोहोचतील!

अशा स्पर्धा खेळाडूंची गुणवत्ता उंचवतात
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन
कणकवली बॅडमिंटन क्लब आणि के एन के. स्मॅशर्स यांच्यामार्फत गेले काही वर्ष बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करून स्थानिक खेळाडूंमध्ये एक उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडू निर्माण होत कणकवली चे नाव राष्ट्रीय पातळी पर्यंत पोहोचेल असे काम करा. असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. कणकवली येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेचे पहिले पारितोषिक 25000 हे नलावडे यांच्याकडून जाहीर करण्यात आले असून दुसरे पारितोषिक 15000 हे नगरसेविका मेघा गांगण यांनी जाहीर केले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक मनस्वी ठाणेकर, आर्या राणे, मेघा गांगण, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, बंडू गांगण, आनंद पोरे यांच्यासह अन्य उपस्थित होते. नलावडे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना अशा स्पर्धा दरवर्षी आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करत रहा असे देखील आवाहन यावेळी केले.





