उत्तम धाकु वंजारे यांनासहाय्यक पोलीस फौजदार पदी बढती.

आचरा पोलिस स्टेशनचे हवालदार व बेळणे आउट पोस्ट चे उत्तम धाकु वंजारे यांना नुकताच सहाय्यक पोलीस फौजदार (ए. एस. आय.) पदी बढती मिळाली. सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे हस्ते त्यांना नियुक्ती पत्र १३ मार्च रोजी सकाळी एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.

नरडवे ता. कणकवली येथील शेतकरी कुटुंबातील उत्तम वंजारे हे १ जानेवारी १९९६ रोजी पोलिस भरतीने सेवेत रुजु झाले. सावंतवाडी मुख्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नोकरीस प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, कणकवली आणि सध्या कार्यरत असलेले पोलीस स्टेशन आचरा येथे अतिशय उत्कृष्ट व स्वच्छपणे आपली नोकरी सांभाळत समोरच्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना योग्य मान सन्मान देत त्यांनी, आपले सेवाकार्य बजावले. ३० वर्षाच्या प्रामाणिक व निस्वार्थ पोलीस सेवेचे फळ, प्रमोशन रूपाने मिळून, महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाने, उत्तम वंजारे यांना सहाय्यक पोलीस फौजदार या पदावर बढती दिली. सदर नियुक्ती पत्र पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी शुक्रवार दि. १३ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वा. पोलीस अधीक्षक कार्यालयात श्री वंजारे यांना प्रदान केले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधिक्षक कु. नयोमी साटम, पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!