भिरवंडे रामेश्वर मंदिरात माघी एकादशी महोत्सव

कणकवली : सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून बुधवारी १ फेब्रुवारी रोजी माघी एकादशी महोत्सव साजरा होणार आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत .अखंड हरिनाम सप्ताहातील ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक हे विशेष आकर्षण असणार आहे.
भिरवंडे येथील श्री देव रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून उद्या महा एकादशी महोत्सव साजरा होत आहे . अखंड हरिनाम सप्ताह प्रतीपंढरपूर असे स्वरूप प्राप्त झाले आहे. उद्याच्या महा एकादशी सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी ११ वाजता भिरवंडे मुंबईवाशीय महिला मंडळ भजन सादर होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता सद्गुरु वामनराव पै शाखा कणकवली च्या वतीने उपासना यज्ञ हरिपाठ आणि जीवनविद्या  हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
तसेच रात्री कणकवलीतील बाल शिवाजी हायस्कूलच्या मुलांचा चित्ररथ सादर होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध बुवा संदीप लोके (लिंगडाळ, देवगड) यांचे सुश्राव्य संगीत वारकरी भजन सादर होणार आहे. त्यानंतर रात्री १२  वाजता श्रीदेव रामेश्वराची पालखी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात निघणार आहे. अखंड हरिनाम सप्ताहातील या एकादशी महोत्सवा निमित्त शेकडो मुंबईकर आणि भिरवंडेकर पाहुणेमंडळी गावात दाखल झाले आहेत. मोठ्या उत्साहात महा एकादशी साजरी केली जाणार आहे.

सितराज परब / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!