एस.पी.एस. फार्मसी कॉलेजमध्ये ओबीई विषयावर शिक्षक विकास कार्यक्रम संपन्न

श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, कुडाळ येथे अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष (IQAC) यांच्या पुढाकाराने “Outcome Based Education (OBE): CO–PO Mapping व Attainment Calculation” या विषयावर एक दिवसीय शिक्षक विकास कार्यक्रम (FDP) संपन्न झाला.
या प्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर संचालिका सौ.नुतन परब, डॉ.स्नेहा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भुपतसेन सावंत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व स़रस्वती देवीला पुष्पहार अर्पण करून झाली.
Outcome Based Education प्रणाली, CO–PO मॅपिंग प्रक्रियेबाबत या विषयातील तज्ञ डॉ.स्नेहा जगताप यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच श्रीकृष्ण मस्के यांनी attainment गणना व Excel आधारित प्रात्यक्षिक सादर केले. फार्मसी महाविद्यालयीन शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक महादेव परब यांनी केले.
या कार्यक्रमामुळे शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्तावृद्धीस तसेच NAAC व NBA मानांकन प्रक्रियेस बळकटी मिळाली असे संस्थेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.





