डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर नावाच्या फलकासमोर पक्षाचा बॅनर

वागदे आंबेडकर नगर येथील ग्रामस्थांनी दिली ग्रामपंचायत जवळ तक्रार
१० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वागदे येथील मुंबई गोवा महामार्गावर सातरल कासरल फाट्याला लागून असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नावाचा बोर्ड अनेक वर्षापासून त्या ठिकाणी स्थित आहे. आजपर्यंत कुणीही सदर नावाच्या बोर्डवर वैयक्तिक अथवा कोणत्याही पक्षाचा बॅनर त्या बोर्डवर लावलेला नाही. परंतु अलिकडेच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे जे उमेदवार विजयी झाले, “त्यांच्या नावाचा भला मोठा अभिनंदनचा बॅनर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर” नावाच्या बोर्डवर लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आलेला आहे. अशी तक्रार तेथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत वागदे यांच्याकडे दिली आहे. हा अत्यंत संताप जनक व निषेधार्ह प्रकार आहे. विजयी उमेदवार कोणत्याही पक्षाचे असोत सदर घटना ही निंदनीय आहे. तरी सरपंच, ग्रामपंचायत वागदे यांनी सदर घटनेची योग्य ती दखल घ्यावी. अन्यथा वरिष्ठ पातळीवर या घटनेची दाद मागण्यात येईल. असे या निवेदनात म्हटले आहे. सुरेंद्र कदम प्रकाश कदम सहदेव कदम अच्युत कदम अशोक तांबे सत्यवान कदम अशोक कदम संतोष कदम उमेश कदम सुशील कदम सुनील कदम आदींनी या विषयाची तक्रार ग्रामपंचायत जवळ दिली आहे.





