पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनंतर हळवल रस्ता भूसंपादन प्रक्रियेला गती

कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्या माध्यमातून भूसंपादन प्रस्ताव प्रांताकडे दाखल
थेट खरेदी पद्धतीने होणार भूसंपादन प्रक्रिया
अखेर पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशान्वये हळवल् फाटा रेल्वे उड्डाणपुलाच्या पोचमार्ग भूसंपादनाचा प्रस्ताव करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात भूसंपादनाकरिता सुमारे 4 कोटी,75 लक्ष भूसंपादनाकरिता महसूल विभागाला रक्कम जमा करण्यात आली आहे.
हळवल फाटा येथील रेल्वे फाटका जवळील उड्डाणपूल सुमारे सन 2014 पासून बांधून पोचमार्ग नसल्याने विना वापर पडून आहे, याबाबत पालकमंत्री यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दिनांक 21/08/2026 रोजी जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी , स्थानिक बाधित होणारे राहवासी, व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रस्तावावर प्रशासकीय यंत्रणेने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन सोमवार दिनांक 24 /08/2026 पर्यंत प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री डी बी बागुल, यांनी प्रांताधिकारी कणकवली यांच्या कार्यालयात जाऊन ह्ळवल रेल्वेउड्डाणपुला च्या पोचमार्गाकरिता करिता थेट खरेदीने भूसंपादनाचा करण्याचा प्रस्ताव सादर केला
या कामाकरिता पालकमंत्री महोदय यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे चार कोटी इतकी भरीव रक्कम मंजूर केली आहे , यापैकी रुपये 75 लक्ष अनामत रक्कम म्हणून साबा विभागाने महसूल विभागाकडे भूसंपादनाकरिता वर्ग केली आहे.
तसेच तोच मार्ग कामाकरिता माननीय खासदार श्री नारायण राणे साहेब यांनी सुमारे वीस कोटी इतकी रक्कम केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजूर करण्याकरिता केंद्रीय भुपृष्ट मंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांना शिफारस केले आहे , त्यामुळे अखेर सुमारे 14 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हळवल फाटका वरील रेल्वे उड्डाणपुलाच्या पोच मार्गाचे काम माननीय पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या दखल घेतल्याने सुटेल अशी हळवलवासी व स्थानिक नागरिकांच्या अशा पल्लवीत झाले आहेत.






