ज्ञानदीप संस्था वायंगणीच्या आवारातील परिसर स्वच्छ, शाळेचे

अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी करून घेतले स्वखर्चाने काम
ज्ञानदीप संस्था वायंगणीच्या आवारात असलेल्या आंब्याच्या सुक्या फांद्या धोकादायक बनल्या होत्या.तसेच आंबा कलमांवर आलेल्या बांडगुळांमुळे झाडांच्या उत्पादनतेवर परिणाम होत होता. नारळ आणि आंबा कलमांच्या भोवताली वाढलेल्या झाडी मुळे विद्यार्थ्यांना सरपटणाऱ्या जनावरांची भिती निर्माण झाली होती.याबाबत ज्ञानदीप संस्था वायंगणी चे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने स्वच्छता करण्यात आली.
तसेचशाळा इमारतीवर वानर उड्या मारून कौले फोडत असल्यामुळे सागाच्या काही किरकोळ फांद्या मारून इमारतीचे रक्षण करण्यात आले व फुटलेली कौले लावून घेण्यात आली.
सदरचे काम अध्यक्ष श्री हनुमंत प्रभू यांनी स्वखर्चाने करून घेतले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री बाबू हडकर, मुख्याध्यापक टकले सर आदी उपस्थित होते.






