महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे बलाढ्य मताधिक्याने होणार विजयी -आम. निलेश राणे

खारेपाटण येथे महायुतीच्या प्रचारार्थ आम.निलेश राणे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या कार्यकर्त्यांचे भव्य शक्तीप्रदर्शन

खारेपाटण पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रचारार्थ आम. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण बाजारपेठेत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचाररॅलीतून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भव्य शक्तीप्रदर्शन केले. आ. निलेश राणे यांनी बाजारपेठेतील मतदारांच्या गाठीभेटी घेत धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करुन उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
भाजप कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, शिवसेना तालुका प्रमुख -मंगेश गुरव,याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद वायंगणकर,माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत, संतोष कानडे, खारेपाटण सरपंच व खारेपाटण जि.प. बिनविरोध निवडून आलेल्या भाजपा सदस्य प्राची ईस्वलकर, उपसरपंच -महेंद्र गुरव,खारेपाटण पंचायत समिती उमेदवार गुरुप्रसाद शिंदे तसेच तळेरे पंचायत समिती उमेदवार राजेश जाधव, मंगेश ब्रह्मदंडे,दिनेश मुद्रस,नाना शेट्ये,रवींद्र शेट्ये,शैलेश सुर्वे,सुहास राऊत, रवींद्र गुरव, राजेंद्र भालेकर, तेजस राऊत, अमित सावंत, अमित मांजरेकर,निशा शेलार,उज्वला चिके, आरती गाठे, मनाली होनाळे, क्षितिजा धुमाळे,पुष्पलता तळेकर,सुधाकर ढेकणे,किरण कर्ले,जयदीप देसाई,शेखर शिंदे,शेखर कांबळे,चिंचवली सरपंच-अशोक पाटील,चंद्रमोहन शिंदे,पप्पू ब्रह्मदंडे, स्मिता पांचाळ, आदी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!