खारेपाटण एसटी स्टँड ते घोडेपाथर रस्ता सिमेंट काँक्रिटचा होणार;पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून शब्द​

खारेपाटण एसटी स्टँड ते घोडेपाथर या मार्गावरील रस्त्याची दुरवस्था लवकरच दूर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने डांबरी रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यामुळे वाहनचालक व स्थानिकांना होणारा त्रास लक्षात घेता, या मार्गावरील सुमारे ८०० मीटर लांबीचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहे.
​झुंजार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रौत्सवाला भेट देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे खारेपाटण येथे आले होते. यावेळी एसटी स्टँडपासून नवरात्रौत्सवाच्या ठिकाणी जात असताना संकेत शेट्ये यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष या मार्गावरील खराब रस्त्याकडे वेधले. दरवर्षी पुराचे पाणी आल्याने रस्ता खराब होतो आणि वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली.
​पालकमंत्री नितेश राणे यांनी हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याचे आश्वासन दिल्याने, स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांची मागणी लवकरच मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे.

error: Content is protected !!