कणकवली भाजपा च्या वतीने यावर्षी देखील भरणार दिवाळी बाजार

सलग आठ वर्ष भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे आयोजन
या दिवाळी बाजारात स्टॉल करिता संपर्क साधण्याचे आवाहन
यावर्षी देखील कणकवली शहर भाजपाच्या वतीने दिवाळी बाजार भरविण्यात येणार असून तीन ते सात नोव्हेंबर पर्यंत कणकवली भाजपा आयोजित दिवाळी बाजार होणार आहे. या दिवाळी बाजाराचे हे सलग आठवे वर्ष असून कणकवली शहरात हा बाजार भरवला जाणार आहे. स्थानिक बचत गट व गृह उद्योगांना या दिवाळी बाजारात थेट वस्तू स्टॉल द्वारे विकता येणार आहेत. त्यामुळे याचा फायदा कणकवली शहरातील बचत गट व गृह उद्योगांना होणार आहे. त्यामुळे या दिवाळी बाजाराच्या अनुषंगाने कणकवली भाजपाकडून तयारी सुरू करण्यात आली असून याबाबतची रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे घरी बनवलेल्या दिवाळी फराळासह दिवाळी करता लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच जागी ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.





