प्रा.माधवी पांचाळ यांना भारतीय रत्न पुरस्कार

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण येथील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या प्रमुख प्राध्यापक श्रीमती माधवी विजय पांचाळ यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व विस्तार कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम भारतीय रत्न पुरस्कार’प्रदान करण्यात आला. या मानाच्या पुरस्कारामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे.
प्रा. पांचाळ यांनी ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी विविध जनजागृती उपक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, गड संवर्धन स्वच्छता मोहीम, समाजाभिमुख प्रकल्प यातून विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दिशा दिली आहे.
त्यांच्या शिक्षण व समाजहिताच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांनी प्रा.माधवी पांचाळ यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.





