हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपाचे उमेदवार मनोज रावराणे यांचा नागवे मध्ये प्रचाराचा शुभारंभ

घरोघरी मतदारांच्या भेटी घेत केले मतदान करण्याचे आवाहन

नागवे गावातून मनोज रावराणे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

आज हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार मनोज तुळशीदास रावराणे यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ नागवे गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून आणि दर्शन घेऊन करण्यात आला. या प्रसंगी मतदारसंघातील सरपंच सौ.सिद्धीका जाधव,उपसरपंच श्री.महेंद्र कुडाळकर,शक्तीकेंद्रमुख राजू पाटकर, बूथ अध्यक्ष सचिन खेडेकर,काका सातवसे, ग्रामपंचायत सदस्य सुलभा परब,शीतल जाधव,संदेश उर्फ मन्या सावंत,सुरेंद्र दळवी,तन्वी आरेकर,योगिता तायशेटे,गावचे मानकरी राजू सावंत, अन्या पटेल,प्रमोद सावंत,बाबा मोरये तसेच ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री देव नागेश्वर देवाच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या विश्वासाने विजयाचा संकल्प करून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी घरोघरी मतदारांच्या भेटी घेत आवाहन करण्यात आले.

error: Content is protected !!