असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात कामत कुटुंबियांकडून ब्लॅंकेटचे वाटप

कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कामत कुटुंबियांचे आधारस्तंभ रमेश कामत यांच्या मार्फत असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमातील 60 आजी – आजोबांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबवल्याचे उद्योजक विशाल कामत यांनी सांगितले. यावेळी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी सरपंच भगवान लोके , माजी सरपंच पंढरी वायंगणकर , उपसरपंच सचिन परब , प्रविण डगरे, रघुनाथ लोके , वैशाली कामत, हर्षदा कामत, साईश कामत, तृप्ती कामत, अमिता नितीन शेट्ये , गणेश काटकर, राजन परब, अमोल नष्टे , वृध्दाश्रमाचे संचालक संदेश शेटये व आजी – आजोबा उपस्थित होते.

error: Content is protected !!