उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राचे मोठे नुकसान!

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या डोळ्यात अश्रू

अजित पवार यांचा अपघातात निधन झाले ही बातमी कळताच आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा नेता म्हणून अजीत पवार यांची ओळख होती. माझे त्या कुटुंबाशी नातं होतं त्यांचा पर्सनल नंबर माझ्याकडे होता. केव्हाही त्यांना कुठल्याही प्रश्नासाठी फोन केला तर लगेच ते फोन उचलत असंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लोकांची काम त्यांच्या माध्यमातून आपण केले आहेत. पण आज त्यांच्या या अचानक जाण्यामुळे आमच्या मध्ये न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आम्हाला फार कठीण प्रसंगातून जावे लागणार आहे.आज आम्हाला अश्रू अनवर झाले आहेत. पवार कुटुंबांवर काय प्रसंग ओढवला आहे याचा विचार आपण करू शकत नाहीत. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावेळी त्यांनी मला विचारलं अबीद काय करू त्यावेळी त्यांनी माझ्या एका शब्दावर राजकोट किल्ला येऊन भेट दिली मी त्यावेळी विमानतळावरून त्यांना राजकोट किल्ल्यावर घेऊन गेलो. अशा अनेक आठवणी या पवार साहेबांच्या आहेत. निधीच्या बाबतीत देखील त्यांनी कधी कमतरता भासू दिली नाही तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नेहमी सन्मानाची वागणूक त्यांनी दिली पण या घटनेनंतर आमच्यावर फार कठीण प्रसंग ओढावला असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सांगितले.

error: Content is protected !!