रांगणातुळसुली-गोरुलेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन
भाजपा मंडल अध्यक्ष दादा साईल यांच्या शुभहस्ते संपन्न
कुडाळ : प्रदेश सचिव निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या पाठपुराव्याने केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा अंतर्गत मंजूर केलेल्या रांगणातुळसुली-गोरुलेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज भाजपा मंडल अध्यक्ष दादा साईल यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, सरचिटणीस देवेंद्र सामंत, उदय सावंत, नागेश आईर, सरपंच नूतन आईर, ग्रामपंचायत सदस्य राजू शेळके, गायत्री गोवेकर, महेश गोरुले, प्रकाश गोरुले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तिथ होते.
यावेळी दादा साईल यांनी रांगणा तुळसुली गावातील जनता कायम नारायण राणे यांच्या आणि भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने येत्या कालावधीत या गावातील उर्वरित सर्व विकासकामे केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, प्रदेश सचिव निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही उपस्थितांना दिली.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ