मुर्तीकार पवन पराडकर यांना पितृशोक

सूर्यकांत विश्राम पराडकर यांचे निधन
आचरा पिरावाडी ग्रामोन्नती मंडळाचे तसेच श्री तरुण संघ, दक्षिणवाडा व श्री हनुमान मंदिर न्यासाचे ज्येष्ठ सभासद, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सूर्यकांत विश्राम पराडकर (वय 94) यांचे रविवारी पहाटे ५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा बजावत असतानाच संगीत, नाट्यकला, मूर्तीकला आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. खऱ्या अर्थाने ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. शिस्तप्रिय, कलाप्रेमी आणि अत्यंत प्रेमळ स्वभावाचे शिक्षक म्हणून ते परीचित होते.
गुरुजींच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातील आणि सामाजिक-सांस्कृतिक चळवळीतील एक मार्गदर्शक, अनुभवी आधारवड गमावला अशा शब्दात
सर्व पिरावाडीकर, ग्रामस्थ, ग्रामोन्नती मंडळ व तरुण संघातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात चार मुलगे,एक मुलगी सुना नातवंडे असा परीवार आहे. आचरा पिरावाडी येथील सुप्रसिद्ध मुर्तीकार पवन पराडकर यांचे ते वडील होत.






