ग्रामीण महिला बहुउद्देशीय संस्था, सिंधुदुर्ग च्या जिल्हा समन्वयक रूपाली कदम यांचे सोशल मीडिया व आजची तरुणाई या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, स्नॅपचॅट, एक्स (ट्विटर) अशा विविध माध्यमांमुळे तरुणांचे विचार, वर्तन आणि जीवनशैली यावर मोठा प्रभाव पडतो. याचे होणारे दुष्परिणाम आजच्या तरुणाई ला समजून सांगण्याच्या उद्देशाने श्रीमती रूपाली कदम विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. याचाच एक भाग म्हणून सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमती रूपाली कदम या
जिल्हा समन्वयक – पूर्व प्राथमिक शाळा मान्यता परिषद इंडिया, जिल्हा प्रतिनिधी – नेक्सस इंटरनॅशनल स्कुल , जिल्हा समन्व्यक – ग्रामीण महिला बहुउद्देशीय संस्था, सिंधुदुर्ग व गेली 10 वर्षे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र फाउंडेशनचा उपक्रमशील मुख्याध्यापिका पुरस्कार प्राप्त तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई चा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त श्रीमती रूपाली कदम यांनी खारेपाटण ज्युनिअर कॉलेज येथे भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. श्रीमती रूपाली कदम Helping hand for blood, स्माईल विथ यू, चाईल्ड हेल्प फाउंडेशन, आभा परिवर्तनवादी संस्था, नेहरू युवा केंद्र, अभिनव शिक्षा केंद्र इ. संस्थासोबत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून चित्रपट गीतलेखन व पार्श्व गायिका. राष्ट्रपती पुरस्कारासह 50 हुन जास्त पुरस्कार प्राप्त ‘मुंघ्यार’ या लघु चित्रपटाचे गीतलेखन व गायन त्यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत सहाय्यक शिक्षिका श्रीमती. सारिका महिंद्रे, श्री गुरव सर स्पोकन इंग्लिश कॉर्डिनेटर प्रियांका मोरे, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!