जि. प., प.स. निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यातून 91 अर्ज वैध

६ अर्ज ठरले अवैध; जि. प. साठी ३५ तर पं. स.साठी ५६ उमेदवार रिंगणात

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यातून एकूण 97 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते . त्यातील 6 अर्ज अवैध झाल्याने 91 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदसाठीचे 2 अर्ज अवैध झाले असून जिल्हा परिषदेच्या 8 जागांसाठी 35 तर पंचायत समितीचे 4 अर्ज अवैध झाल्याने पंचायत समितीच्या 16 जागासाठी 56 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.बिडवाडी पंचायत समितीच्या ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार विद्या विजय शिंदे यांचा अर्ज अवैध ठरल्याने भाजपच्या संजना राणे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. २७ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने २७ रोजी लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उमेदवार अर्ज छाननीच्या निमित्ताने कणकवली तहसील कार्यालय आवारात उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच राजकीय पदाधिकारी यांनी गर्दी केली होती. यावेळी ॲड. राजेंद्र रावराणे व त्यांचे सहकारी बाजू मांडण्यासाठी उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती
निवडणुकीच्या अनुषंगाने अर्ज छाननी प्रक्रिया गुरुवारी कणकवली तहसील कार्यालयात पार पडली. यामध्ये तीन जणांचे अर्ज अवैध ठरले. याचाच परिणाम म्हणजे बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघ भाजपसाठी बिनविरोध झाला आहे. कणकवली तालुक्यात तीन ठिकाणी एकाच उमेदवाराचे प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले होते. दोन्ही अर्ज वैध ठरल्याने यातील एक अर्ज आपोआपच रद्द झाला आहे. त्यामुळे आता 91 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

जानवली पंचायत समितीच्या अपक्ष उमेदवार अनिता गजानन चव्हाण यांनी अर्जासोबत शपथपत्र जोडले नव्हते. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवला गेला. बिडवाडी पंचायत समितीच्या उबाठा शिवसेनेच्या उमेदवार विद्या विजय शिंदे यांना 2001 नंतर तीन अपत्ये झाल्याची बाब भाजपच्या उमेदवाराने निदर्शनास आणली. त्यामुळे विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरवला गेला. तर लोरे नंबर १ पंचायत समिती मतदार संघातील उबाठा शिवसेनेच्या उमेदवार सिद्धीशा सिद्धेश राणे या कुडाळ पंचायत समितीच्या मतदार असल्याने त्यांचाही अर्ज अवैध ठरवला गेला.
कलमठ जिल्हा परिषद मतदार संघातून वैदेही गुडेकर, कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातून नीरज मोरये, नांदगाव पंचायत समिती मतदार संघातून प्राची मोरये यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले होते. दोन्ही अर्ज वैध ठरल्याने त्यातील एक अर्ज आपोआप रद्द करण्यात आला. त्यामुळे 91 उमेदवारांचे 91 अर्ज वैध ठरले आहेत.
छाननी प्रसंगी नाटळ जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उत्तम लोके यांनी भाजपा उमेदवार
संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उमेदवारीला शपथपत्रात एका मालमत्तेचा उल्लेख नसल्याबाबत हरकत घेतली मात्र ही फेटाळण्यात आली.

कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे.
हरकुळ बुद्रुक जि. प.- मनोज रावराणे (भाजपा), मंगेश सावंत (उबाठा सेना), सुरेश सावंत, प्रितम मोर्ये, संदेश सावंत, संजना सावंत, संतोष कानडे, प्रथमेश सावंत, प्रमोद सांगवेकर (सर्व अपक्ष)

कलमठ जि. प. – सुप्रिया संदीप मेस्त्री (भाजप), वैदेही गुडेकर ( उबाठा), धनश्री मेस्त्री (उबाठा).

कळसुली जि. प.- शीतल दळवी (भाजप), प्राची आमडोसकर (उबाठा), अंकिता आमडोसकर व शुभदा देसाई (अपक्ष).

नाटळ जि. प. – संदेश उर्फ गोट्या सावंत (भाजप), उत्तम लोके (उबाठा शिवसेना), सौ. संजना सावंत व सुरेश सावंत (दोन्ही अपक्ष).
खारेपाटण जि. प.- प्राची ईस्वलकर (भाजप), मीनल तळगांवकर (उबाठा), उज्वला चिके (अपक्ष).

कासार्डे जि. प.- संतोष पारकर (भाजप), हनुमंत म्हसकर (उबाठा शिवसेना), नीरज मोरये ( अपक्ष)

जानवली जि. प.- रूहिता तांबे (शिवसेना), हेलन कांबळे (उबाठा),

फोंडाघाट जि. प.- सदानंद उर्फ बबन हळदिवे व सुजाता हळदिवे (शिवसेना शिंदे), अनंत पिळणकर (राष्ट्रवादी एसपी), राजन चिके (अपक्ष), संतोष कानडे (अपक्ष), देवेंद्र पिळणकर (अपक्ष), राजन नानचे (अपक्ष).

पंचायत समिती उमेदवार
खारेपाटण पं. स. – गुरुप्रसाद शिंदे, मंगेश गुरव (शिवसेना शिंदे), रामचंद्र राऊत (उबाठा), रमाकांत राऊत व रफीक नाईक (अपक्ष)

तळेरे पं. स. – राजेश जाधव (भाजप), प्रवीण वरुणकर (काँग्रेस), निवृत्ती पवार (अपक्ष)

कासार्डे पं. स. – सहदेव उर्फ अण्णा खाडये (भाजप), मयुर पेडणेकर (उबाठा), संजय नकाशे (अपक्ष).

नांदगाव पं. स.- हर्षदा वाळके (भाजप), धनश्री मेस्त्री ( उबाठा), प्राची मोर्ये (अपक्ष).

जानवली पं. स. – महेश्वरी चव्हाण (भाजप), हेलन कांबळे (उबाठा),

बीडवाडी पं. स. संजना राणे (भाजप)

फोंडाघाट पं. स.- पवन भालेकर (भाजप), चैतन्य सावंत, साईनाथ भोवड (उबाठा), ध्रुवबाळ गोसावी, राजेश शिरोडकर, सुभाष सावंत (सर्व अपक्ष).

लोरे पं. स. – मानसी मराठे (भाजप), किर्ती एकावडे (उबाठा), मनिषा राणे (अपक्ष).

हरकुळ खुर्द पं. स.- चंद्रहास उर्फ बबलू सावंत (भाजप), अविनाश सावंत (उबाठा), दीपक रासम व विद्याधर तांबे (अपक्ष).

हरकुळ बु. पं. स. दिव्या पेडणेकर व सायली तोरस्कर (दोन्ही भाजप), वैदेही तायशेटे (उबाठा), नेहा चिंदरकर (अपक्ष).

वरवडे पं. स. – राजेश उर्फ सोनू सावंत (भाजप), सुधीर सावंत (उबाठा), शांताराम सादये (मनसे),

कलमठ पं. स. गुरूनाथ वर्देकर (भाजप), विनायक उर्फ बाळू मेस्त्री (राष्ट्रीय काँग्रेस), धीरज मेस्त्री (उबाठा), विजय चिंदरकर, नितीन मेस्त्री (दोन्ही अपक्ष)

कळसुली पं. स. – लक्ष्मण गावडे (भाजप), मनोहर मालंडकर, अनंत राणे (दोन्ही शिवसेना उबाठा), भालचंद्र दळवी (अपक्ष).

ओसरगाव पं. स. – अक्षता राणे
(शिवसेना शिंदे), चंदना चंद्रहास राणे (उबाठा शिवसेना), समृद्धी सावंत व नेहा कुलकर्णी (दोन्ही अपक्ष).

नाटळ पं. स. – सायली कृपाळ व वैष्णवी सुतार (दोन्ही भाजप), धनश्री मेस्त्री (उबाठा),

नरडवे पं. स. राजश्री पवार व वैष्णवी सुतार (दोन्ही भाजप) पुजा
गांवकर (उबाठा) हे उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

जि. प. साठी 35 उमेदवार
कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांमध्ये एकूण 35 उमेदवार रिंगणात आहेत .यामध्ये हरकूळ बुद्रुक ९, कलमठ ३, कळसुली ४, नाटळ ४ , खारेपाटण ३, कासार्डे ३, जाणवली २, फोंडाघाट ७ असे उमेदवार रिंगणात आहेत. हरकूळ मध्ये सर्वाधिक ९ उमेदवार रिंगणात आहेत. तर जाणवलीमध्ये २ उमेदवार असल्याने दुरंगी सामना रंगणार आहे.

पंचायत समितीसाठी ५६ उमेदवार

कणकवली तालुक्यातील पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये खारेपाटण ५, तळेरे ३, कासार्डे ३, नांदगाव ३, जाणवली २, बिडवाडी १, फोंडाघाट ६, लोरे ३, हरकूळ खुर्द ४, हरकूळ बुद्रुक ४, वरवडे ३, कलमठ ५, कळसुली ४, ओसरगाव ४, नाटळ ३, नरडवे ३ या उमेदवारांचा समावेश असून बिडवाडी पंचायत समिती बिनविरोध झाली आहे तर जाणवली पंचायत समिती मतदारसंघात दुरंगी लढत होणार आहे.

error: Content is protected !!