खारेपाटण येथील श्री देव कालभैरव जत्रोत्सव २३ व २४ जानेवारी २०२६ रोजी

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या गावातील ७२ खेड्यांतील १२९ देवांचे आराध्य व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री देव कालभैरव देवाचा यात्रोत्सव कार्यक्रम यंदा दि.२३ व २४ जानेवारी २०२६ रोजी सलग दोन दिवस साजरा होणार असून यानिमित्ताने विविध धार्मिक व संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री देव कालभैरव – दुर्गादेवी ट्रस्ट खारेपाटण चे अध्यक्ष श्री मधुकर शेठ गुरव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
सलग दोन दिवस साजरा होणारा श्री देव कालभैरव यात्रोत्सव कार्यक्रमानिमित्त शुक्रवार दि.२३ जानेवारी रोजी २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता लघुरुद्र,दुपारी १.०० वाजता आरती व प्रसाद सायंकाळी ७.०० वाजता पालखी प्रदक्षिणा तर शनिवार दि.२४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता अभिषेक,दुपारी १.०० वाजता आरती व प्रसाद,सायंकाळी ७.०० वाजता ब्राम्हणदेव प्रासादिक मंडळ, उपळे कदमवाडी येथील बुवा – केदार कमलाकर कदम यांचे सुस्वर भजन,रात्री ९.०० वाजता स्थानिक मुलांचे संस्कृतिक कार्यक्रम तर रात्री ११.०० वाजता वैभव म्युझिकल नाईट,कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्रा व सोबत २ अंकी नाटिका – “थांब लेकी ओटी घेऊन जा.” इत्यादी कार्यक्रम सादर होणार आहेत.
तरी श्री देव कालभैरव जत्रा उत्सव कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण विश्वस्त मंडळ तसेच श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर जीर्णोद्वर कमिटी खारेपाटण व महिला सहाय्यक कमिटी खारेपाटण आणि बारा पाच वतनदार व खारेपाटण ग्रामस्थ मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.





