कुडादेशकर ज्ञातीचा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात

विविध मान्यवरांचा संस्थेच्या वतीने करण्यात आला सत्कार

समाज बांधव – भगिनींच्या गुणदर्शन कार्यक्रमाने मिळवली सर्वांचीच वाहवा

दरवर्षी प्रमाणे कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज, कणकवली शहर व परिसरातील ज्ञाती बांधवांचे स्नेह संमेलन वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञाती मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तकुमार उर्फ सुरेश सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. सोबत माजी अध्यक्ष हेमंत परुळेकर, कमलाकर महाजन, पूर्णानंद महिला मंचच्या अध्यक्षा सौ. सुलभा सामंत, श्री. बाळा बावकर आदी उपस्थित होते.
यानंतर मुलांसाठी मजेशीर मैदानी खेळ आणि स्मार्ट कपल स्पर्धेसाठी पती-पत्नीचे विविध खेळ घेण्यात आले. दुसऱ्या सत्रात रेकॉर्ड डान्स, गीत गायन, एकपात्री प्रयोग यांनी रंगत आणली. स्नेहा तेंडुलकर आणि संध्या वायंगणकर यांची गणेश वंदना, प्रसाद ठाकूर-मधुर ठाकूर, चेतन तेंडुलकर, मृणाल ठाकूर, संध्या खानोलकर इत्यादींचे बहारदार कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले. तेज देसाई याचा ‘राक्षस’ आणि मृणाल ठाकूर यांचा कांतारा मधील भुताकोला हे सर्वांची वाहवा मिळवून गेले.
लकी ड्रॉ सोडत मध्ये विजया खानोलकर प्रथम बक्षिसाच्या मानकरी झाल्या तर प्रतीक माईणकर हे आपल्या पत्नीसह पैठणी-कुर्ता पायजमा बक्षिसांचे विजयी दावेदार झाले.
पैठणी-कुर्ता पायजमा बक्षीस मालू गार्मेंट्स यांनी प्रायोजित केले होते तर लकी ड्रॉ बक्षिसे हॉटेल बावर्ची, प्रसाद ठाकूर, विश्वास पाटकर, बाळा बावकर यांनी पुरस्कृत केली होती. प्रभू गुरुजी, प्रसन्ना देसाई, मनाली देसाई, हर्षदा प्रभू, संतोष वायंगणकर, पूर्णानंद महिला मंचच्या सर्व सदस्य महिला यांचे विशेष सत्कार करण्यात आले.
स्नेहमेळाव्यासाठी सुमारे ३०० बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन, निवेदन श्री. बाबुराव सामंत यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. राजेश आजगावकर, ॲड. एन. आर.देसाई, संदीप ठाकूर, प्रसन्ना देसाई, सुनील आजगावकर, महेश प्रभू सर, मृणाल ठाकूर, मनिषा देसाई, राजश्री ठाकूर, सुलभा सामंत, प्रीती आजगावकर, सपना आणि सानिका देसाई, हर्षदा सामंत, लिशा ठाकूर, दुर्वा आजगावकर सुनील तेंडुलकर आदींनी मेहनत घेतली. सुनील मंडप डेकोरेटर्सचे सुनील आजगावकर यांनी प्रकाश योजना सामग्री पुरविली होती.

error: Content is protected !!