माजी विद्यार्थी संघटना टोपीवाला हायस्कूल – स्नेह मेळावा

टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे टोपीवाला हायस्कूल आणि मालवण एज्युकेशन सोसायटीशी संलग्न इतर शैक्षणिक संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह-मेळावा दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ४ ते ६:३० या वेळेत मालवणमध्ये टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये संघटनेचा वार्षिक अहवाल, कार्यपद्धती याची माहिती दिली जाईलच पण त्याचबरोबर MVS च्या वेबसाईटचे उद्घाटन केले जाणार आहे.

मेळाव्यासाठी प्रत्येकी फक्त रू. १०० एवढी अत्यल्प वर्गणी ठेवण्यात आली आहे आणि ती सोबतच्या QR कोड द्वारे जमा करता येईल. शाळेतील व्यं. ह. सांगावकर ज्ञानमंदीर या इमारतीतील संघटनेच्या कार्यालयात सकाळी १० ते १२:३० या वेळेत वर्गणी भरून नाव नोंदवता येईल.

माजी विद्यार्थी संघटनेने सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित रहावे आणि त्यासाठी वर्गणी भरून आपले नाव 9529786781 या क्रमांकावर नोंदवावे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. रघुनाथ शेवडे: 94211 45699
श्री. नंदन देसाई: 94047 76446
डॉ. अश्विन दिघे: 94047 50094
श्री. प्रमोद मोहिते: 95297 84168

error: Content is protected !!