आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मस्थळी पोंभुर्ले येथील स्मारक व परिसराची साफसफाई

स्मारकाच्या स्वच्छता मोहिमेने समाजासमोर वेगळा आदर्श
तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ आणि श्रावणी कम्प्युटर तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ आणि श्रावणी कम्प्युटर तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ डिसेंबर अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. गेल्या नऊ वर्षापासून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मस्थळी पोंभुर्ले येथील स्मारक व परिसराची साफसफाई व स्वच्छता मोहीम राबवून थर्टी फर्स्ट वेगळ्या पद्धतीने साजरा करुन समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
पोंभुर्ले येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकस्थळी हा कार्यक्रम मागील नऊ वर्षापासून आयोजित करण्यात येतो. यावेळी श्रावणी कम्प्युटर विद्यार्थ्यांनी आणि तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे सदस्यांनी श्रमदानातून बाळशास्त्री जांभेकर स्मारक सभागृहाची झाडलोट करून तसेच पाण्याने चकाचक धुऊन स्वच्छ केले. त्याचबरोबर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच एकत्रितपणे स्नेह मेळावा व वनभोजन करण्यात आले. वर्ष अखेरीच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला सर्वत्र थर्टी फस्ट पार्टी करुन साजरा करण्यात येतो मात्र या गोष्टीला फाटा देऊन समाजाला एक चांगला सकारात्मक संदेश देण्यासाठी अशा प्रकारेही थर्टी फस्ट साजरा करता येऊ शकतो हाच यातून संदेश दिला आहे. थर्टी फस्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने साजरे करण्याचा प्रयोग सलग नवव्या वर्षी अखंडपणे सुरू ठेवला आहे.
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावाची आणि त्यांच्या अलौकिक कार्याची नवीन पिढीला माहिती व्हावी यासाठीच दरवर्षी थर्टी फस्टला स्मारकाची साफसफाई दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवून करण्यात येते.
त्यानंतर सतीश मदभावे, प्रा. प्रशांत हटकर, सौ. हटकर, संजय खानविलकर, उदय दुधवडकर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या विषयी मौलिक मार्गदर्शन केले तर विराज नांदलस्कर यांने स्वरचित 'पत्रकार' या विषयीची अतिशय सुंदर कविता सादर केली तसेच सहभागी विद्यार्थ्यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय दुदवडकर, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष व पत्रकार संघाचे सचिव संजय खानविलकर, जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर, श्रावणी कम्प्युटरचे संचालक सतीश मदभावे, तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयाचे पत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. प्रशांत हटकर, सौ. हटकर, अंगणवाडी सेविका श्रीमती नारकर, श्रावणी कम्प्युटरचे विद्यार्थी स्मितेश पाष्टे, स्नेहल तळेकर, रोशनी बागवे, सोहम सावंत, विराज नांदलस्कर, श्रेयस तावडे आदींसह अन्य विद्यार्थी सहभागी झाले होते.





