कणकवली शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये महिलांना मोठे स्थान देणार!

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा निर्णय
आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांची बैठक घेतला आढावा
नगराध्यक्ष पदी निवडून आल्यानंतर कणकवलीची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सातत्याने शहराच्या विकास विषयक कामांच्या अनुषंगाने जोरदार आढावा सत्र सुरू केले आहे. कणकवली शहराच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने श्री. पारकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्याची बैठक घेत त्यांना सूचना दिल्या. कणकवली शहरामध्ये स्वच्छते बाबत प्रश्न निर्माण झालेला होता. प्रभाग निहाय समस्या जाणून घेऊन कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग कसा काढता येईल यावर चर्चा केली. तसेच बैठकी दरम्यान असे सुचवण्यात आले की, सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ही बैठक घेत असताना २० टक्के महिलां ना आरोग्य यंत्रणेत सामील करून घेण्याचे, सुचविण्यात आले. त्याची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे अशी ग्वाही याप्रसंगी श्री पारकर यांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक, जयेश धुमाळे, प्रसाद अंधारी, सुदीप कांबळे, निकित मुरकर व नगरपंचायत आरोग्य व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.





