जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार जाहीर

७ जानेवारीला तारकर्ली येथे पुरस्कार वितरण
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने ग्रंथालय चळवळीत आदर्श काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि सेवक यांना पुरस्कार दरवर्षी दिले जातात. सन २०२५-२०२६ सालचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये आदर्श ग्रंथालय संस्था पुरस्कार श्री आर्यादुर्गा वाचनमंदिर, वागदे ता. कणकवली, कनेडी पंचक्रोशी आणि ग्राम वाचनालय, सांगवे कनेडी ता. कणकवली याना जाहीर झाला आहे. आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार नंदकुमार श्रीकृष्ण सोमण, सदस्य श्री रामेश्वर वाचनालय, मिठबाव ता. देवगड आणि प्रकाश किरात पेडणेकर, अध्यक्ष ज्ञानदीप ग्रंथालय मंडळ वायगणी पंचक्रोशी, ता. मालवण याना जाहीर झाला आहे.आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्कार संजय काशीनाथ शिंदे, ग्रंथपाल नगर वाचन मंदिर, मालवण आणि श्रीम. ऋतुजा राजेंद्र केळकर, ग्रंथपाल बॅ. नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बुधवार दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात सिंधदुर्ग वाचन मंदिर, ब्ल्यु हेवन रिसॉर्ट, तारकर्ली येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. असे जिल्हा ग्रंथालय संघाचे वतीने अध्यक्ष मंगेश आत्माराम मसके, कार्यवाह राजन पांचाळ यांनी जाहीर केले आहे.





