कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजाचा स्नेहमेळावा उद्या कणकवलीत

ज्ञाती बांधवांचे होणार विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण कणकवली शहर व परिसर ज्ञाती बांधवांच्या वतीने ‘स्नेहमेळावा २०२६’ या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान या ठिकाणी करण्यात आले आहे. हा स्नेहमेळावा रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली येथे सायंकाळी ४ वाजल्यापासून संपन्न होणार आहे.
समाजातील बांधवांमधील आपुलकी, स्नेह आणि नातेसंबंध दृढ व्हावेत या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ४ ते ४.10 या वेळेत नोंदणी, स्वागत, दीपप्रज्वलन, स्वामी प्रतिमा पूजन व स्वामी स्तवनाने होणार आहे. त्यानंतर ४.10 ते 4.३० या वेळेत प्रास्ताविक व चहापान कार्यक्रम होईल.
सायंकाळी 4.30 ते ८ वाजेपर्यंत विविध गुणदर्शन कार्यक्रम, स्मार्ट कपल स्पर्धा तसेच लहान मुलांसाठी प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ८ ते ८.३० या वेळेत लकी ड्रॉ विजेत्यांची निवड व बक्षीस वितरण होणार असून रात्री ८.३० नंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
या स्नेहमेळाव्यास समाजातील सर्व बांधवांनी कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक राजू आजगांवकर असून अधिक माहितीसाठी ९४२१२६६४६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.





