महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त २जानेवारी ते ८जानेवारी या कालावधीत सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून विविध जनजागृती पर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त सिंधुदुर्ग पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ५जानेवारी रोजी ८.३०वाजता मोटारसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. सदर मोटार सायकल रॅली हि पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, अप्पर पोलीस अधिक्षक यांचे उपस्थित कुणकेश्वर ता.देवगड येथून सुरू होणार आहे. सागरी महामार्गाने कुणकेश्वर, आचरा,मालवण, निवती,वेंगुर्ला अशी जात वेंगुर्ला येथील बँ नाथ पै क्रिडांगण येथे समारोप होणार आहे. तरी या मोटारसायकल रॅली साठी सर्व नागरिकांनी आपल्या मोटारसायकल घेऊन सहभागी व्हावे. सहभागीहोण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करुन सहभागी होण्याचे आवाहनआचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांनी केले

error: Content is protected !!