बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाचे नेरूर येथे एनएसएस शिबिर संपन्न

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत नेरुर येथे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शनपर व्याख्याने, विद्यार्थ्यांचे समाजासाठीचे श्रमदान, आरोग्य तपासणी, बौद्धिक चर्चासत्रे, सर्वेक्षण, गटचर्चा ,तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन झाले. या शिबिरादरम्यान आयोजित व्याख्यानमालेमध्ये विद्यार्थ्यांना, “राष्ट्रीय सेवा योजनांमध्ये युवकांचे योगदान” (वक्ते – प्राध्यापक अरुण मर्गज), “किशोरवयीन मुलींचे आरोग्य व आहाराचे महत्त्व “(वक्ते – सौ डॉ.गार्गी ओरसकर), “दैनंदिन आरोग्य व योगा “(वक्ते प्राध्यापिका रिद्धी पाताडे), “बालकांचे लैंगिक शोषण नियंत्रण व कायदे” (वक्ते – ॲड .सौ तृप्ती प्रभू देसाई),”सायबर गुन्हे” (वक्ते – प्रमोद काळसेकर) तसेच “नव्याने समाविष्ट कायद्यांची ओळख ” (वक्ते – ॲड .सौ नीलांगी रांगणेकर) अशा विविध विषयांवर मार्गदर्शन पर सत्रे आयोजन करण्यात आली होती.
तसेच या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी श्रमदान शिबिरा अंतर्गत नेरुर ग्रामपंचायत, कलेश्वर मंदिर, कलेश्वर हायस्कूल, व प्राथमिक शाळेची परिसर स्वच्छता तसेच कलेश्वर हायस्कूल नेरुर येथील किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी व मुलींना आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात विविध दिवसांमध्ये रणजीत देसाई माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सिंधुदुर्ग, सौ .भक्ति घाडीगावकर सरपंच नेरुर, दत्ताराम म्हाडदळकर उपसरपंच नेरुर ,शेखर गावडे माजी उपसरपंच नेरुर, सौ सुनीती नाईक प्राचार्य कलेश्वर विद्यामंदिर नेरूर, सौ मयुरी बांदेकर ग्रामसेवक नेरुर, प्रदीप नाईक माजी अध्यक्ष श्री देव कलेश्वर देवस्थान उपसमिती नेरुर, संतोष चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष नेरुर, गणेश मेस्त्री पोलीस पाटील नेरुर, प्रकाश नेरुरकर माजी सरपंच, प्रसाद पोईपकर माजी सरपंच नेरुर तसेच उमेश गाळवणकर, अध्यक्ष बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग इ. मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
सांगता समारंभाच्या वेळेला मनोगत व्यक्त करताना रणजीत देसाई म्हणले, निरोगी आयुष्यासाठी आजच्या काळात श्रमप्रतिष्ठा सर्वात महत्त्वाची आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी श्रमदान करणे गरजेचे असल्याचे सांगत या उत्तम उपक्रमाची त्यांनी कौतुक केली व शुभेच्छा दिल्या. ऍड निलंगी रांगणेकर- सावंत यांनी नवीन कायद्याची ओळख करून देत असताना श्रमाबरोबर, शारीरिक आरोग्याच्या ज्ञानाबरोबरच, कायद्याचं ज्ञान किती आजच्या काळात गरजेचं आहे याची माहिती दिली. आपल्या न्याय हक्कासाठीच्या विविध तरतुदी आपणास ज्ञात असणे गरजेचे आहे हे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये कायद्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी या निवासी श्रम संस्कार शिबीर या उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिरातील विद्यार्थ्यांना नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रा. सौ वैशाली ओटवणेकर, प्रा.वैजयंती नर ,मानसी धुरी व प्राचार्य सौ. कल्पना भंडारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

error: Content is protected !!