संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा ठरला संस्मरणीय

विद्यार्थी-प्राध्यापकांनी जागविल्या जुन्या आठवणी

सन २००० बॅचचा रौप्य महोत्सवी सोहळा

कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आयडियल कॉलेज म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला.
क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या अशा उपक्रमांस क.म.शि.प्र.मंडळाचे सहकार्य नेहमीच असणार असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जुन्या-नव्या आठवणींना उजाळा देणारी छायाचित्रे पी.पी.टी.द्वारे प्रदर्शीत केली.
याप्रसंगी माजी प्राचार्य महादेव कानशिडे, माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा ॲड.निलांगी रांगणेकर, उपाध्यक्ष उद्योजक श्री.चंद्रकांत कदम, खजिनदार सी.ए.सौ.जयंती कुलकर्णी, सचिव प्रा.अरूण मार्गज, सी.ए.श्री.सुनील सौदागर, अजीत राणे, माजी विद्यार्थी तथा संविता आश्रमचे संदीप परब, माजी विद्यार्थी भूपत पुष्पसेन सावंत उपस्थित होते. अजीत राणे यांनी यापूर्वीही महाविद्यालयाला आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. पुढेही आपण असेच सहकार्य माजी विद्यार्थी या नात्याने करणार असल्याचे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
माजी विद्यार्थी या नात्याने नोटरी ॲड.अमोल सामंत(क.म.शि.प्र.मंडळाचे सदस्य) तसेच विविध क्षेत्रांमध्ये आपले व महाविद्यालायाचे नाव उज्ज्वल केलेले माजी विद्यार्थी बहुसंख्येने श्री एकनाथ ठाकुर सभागृहामध्ये उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालायाचे माजी प्राचार्य महादेव कानाशिडे यांचा याप्रसंगी प्रा.डॉ.अनंत लोखंडे यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतामध्ये माजी प्राचार्य महादेव कानाशिडे यांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगितल्या. प्रा.डॉ.व्ही.जी.भास्कर, प्रा.डॉ.अनंत लोखंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी संघाच्या सचिव प्रा.अरूण मार्गज यांनी स्नेहमेळाव्याचा हेतू कथन केला. तसेच कोणत्याही महाविद्यालयाच्या भावी वाटचालीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असते असे ते म्हणाले. माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा ॲड.निलांगी रांगणेकर,खजिनदार सी.ए.सौ.जयंती कुलकर्णी,सी.ए.सुनील सौदागर,पुष्पसेन ज्ञानपीठाचे भूपत पुष्पसेन सावंत आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. रुपाली कशाळीकर, शिल्पा शिरोडकर, दिव्या बांदेकर या माजी विद्यार्थींनींचे मनोगत याप्रसंगी झाले. सर्वच माजी विद्यार्थ्यांच्या मनोगतामध्ये भावनिक ओलावा होता.
माजी विद्यार्थी बहुसंख्येने उस्थित असल्यामुळे मेळाव्याची शान वाढली. सन २००० सालच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण प्रवासाला २५ वर्षे वर्षे पूर्ण झाल्यामुळे मेळाव्यात या बॅचचे केक कापून रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले.
क.म.शि.प्र.मंडळाचे संस्था पदाधिकारी,सरकार्यवाह अनंत वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांचे मार्गदर्शन, मेळाव्याच्या पूर्वनियोजनामध्ये माजी विद्यार्थी संघाचे विशेष सहाय्य, सचिव प्रा.अरुण मर्गज, तसेच अध्यक्षा निलांगी रांगणेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत कदम, सी.ए. सौ. जयंती कुलकर्णी, राजू(श्रीहरी) बक्षी, रत्नाकर जोशी, निलेश जोशी आदींनी वेळोवेळी महाविद्यालयाला दिलेल्या भेटी या सर्वांमुळे हा मेळावा सुनियोजित पडला. माजी विद्यार्थी मेळावा आयोजन समितीच्या समन्वयक म्हणून प्रा. काजल मातोंडकर यांनी काम पाहिले.उपस्थित मान्यवरांचा परिचय डॉ.रवींद्र ठाकुर यांनी केला. माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा.संतोष वालावलकर यांनी तर आभार प्रदर्शन कॅप्टन डॉ.एस.टी.आवटे यांनी केले. महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी याचेही सहकार्य लाभले. स्नेहभोजनाने मेळाव्याची सांगता झाली.

error: Content is protected !!